मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या सत्यपाल मलिक यांना सीबीआयचे समन्स

0
248

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. मलिक यांनी ‘एबीपी लाइव्ह’शी संवाद साधताना मोठा खुलासा केलाय. मला केंद्रीय तपास संस्थेच्या (CBI) कार्यालयात जाण्याची गरज नाही. उलट सीबीआयचे अधिकारी स्वत: मला भेटायला घरी येतील, असं मलिकांनी म्हटलंय.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सततच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान, सीबीआयनं त्यांना समन्स बजावल्याचं प्रकरण चव्हाट्यावर आलं होतं. यानंतर काँग्रेस आणि आपचे नेते केंद्र सरकारला घेराव घालत आहेत. मात्र, या प्रकरणी सत्यपाल मलिक यांनी सीबीआयनं आपल्याला समन्स पाठवलं नसून स्पष्टीकरण मागितल्याचा खुलासा केलाय.

‘मला सीबीआयकडून कोणतंही समन्स मिळालेलं नाही, ही केवळ अफवा आहे’, असं त्यांनी म्हटलंय. मलिक पुढं म्हणाले, सीबीआय अधिकारी माझी चौकशी करण्यासाठी येणार आहेत. यादरम्यान, अधिकारी माझ्या निवासस्थानी येऊन माझ्याकडून खुलासा मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या प्रकरणी सीबीआयनं 27 किंवा 28 एप्रिलची वेळ मागितली होती. सत्यपाल मलिक 27-28 एप्रिल रोजी राजस्थानमध्ये राहणार आहेत. यामुळंच 28 एप्रिलनंतर सीबीआयचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचून त्याच्याकडून खुलासा मागू शकतात.