मोठ्या सिलेंडर टाकीतून लहान टाकीत गॅस भरून विकत होता; पोलिसांना खबर लागताच…

0
412

हिंजवडी, दि. 6 (पीसीबी): बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडर टाकीतून लहान सिलेंडर टाकीत गॅस भरून त्याची चढ्या दराने विक्री करणे. तसेच गॅसची विनापरवाना साठवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुळशी तालुक्यातील भोईरवाडी येथे करण्यात आली.

संताजी तानाजी माने (वय 23, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक ए बी हिंगोले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संताजी याने भोईरवाडी येथील आनंदा भोईर यांच्या गाळ्यात आई गॅस एंटरप्रायजेस नावाचे दुकान सुरु केले. त्यात 19.3 किलो वजनाच्या मोठ्या टाक्यांमधून गॅस काढून 4 किलो आणि साडेआठ किलो वजनाच्या लहान टाक्यात भरून त्याची चढ्या दराने विक्री केली. यासाठी त्याने गॅसची साठवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.