मोठी बातमी! आता शहरात अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेडवर होणार कारवाई

0
458

पिंपरी, दि.०३ (पीसीबी) : लवकरच पिंपरी शिंचवड महानगरपालिका हद्दीतील असलेल्या अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेड बांधकामांवर कारवाई होणार असल्याचे आवाहन आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले. ज्या नागरिकांनी अनधिकृतपणे पत्राशेडचे बांधकाम केले आहे त्यांना महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आले होते व पत्राशेड काढण्यासाठी मुदत दिली होती, मात्र पत्राशेड धारकांनी अद्यापही अनधिकृत बांधकामे काढल्याचे दिसून येत नाही. जर पत्राशेड धारकांनी स्वतः हुन अनधिकृत बांधकामे 30-09-2021 पर्यंत निष्कासित केले नाही तर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल .तसेच सदर कारवाईचा खर्च देखील संबंधित मालकाकडून वसूल करण्यात येईल असे जाहीर आवाहन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.