मेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप

0
495

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पीएनबी बँकेला २६ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला मेहुल चोकसी यांने केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची कन्या आणि जावई जयेश बक्षी यांच्या फर्मला रिटेनर म्हणून नेमले होते. तसेच जेटली यांना मेहुल चोकसी यांच्या बँक घोटळ्याची पूर्ण कल्पना होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे जेटली अडचणीत येण्याची शक्यता आहे.     

काँग्रेस नेते सचिन पायलट, खासदार राजीव सातव, सुषमा सिंह देव यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन केला. जेटलींना मेहुल चोकसीच्या संपूर्ण गैरकारभाराची माहिती आधीपासून होती. परंतु कन्या आणि जावयाच्या प्रेमापोटी त्यांनी हे प्रकरण बाहेर येऊ दिले नाही, असे आरोपही यावेळी करण्यात आला.

चोकसीची कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडचे काम जेटली यांची मुलगी सोनाली आणि जावई जयेश बक्षी यांच्याच फर्मला दिले होते. यासाठी २४ लाख देण्यात आले होते, असाही आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान, सीबीआयने चोकसीच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने पैसे  मेहुल चोकसीच्या खात्यात जमा करण्यात आले. जे लोक परदेशात पळून जात आहेत. त्यांना मदत करण्यात भाजपच्याच नेत्यांचा कसा संबंध येतो, असा सवाल काँगेसने उपस्थित केला आहे.