मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

0
323

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मानदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना शस्त्रक्रियेसाठी एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज ती शस्त्रक्रिया पार पडली असून शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना मागील अनेक दिवसांपासून मानदुखी व पाठदुखीचा त्रास जाणवत होता. याच कारणामुळे ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळत होते. किंवा अनेक कार्यक्रमांना ते ऑनलाईन उपस्थिती दर्शवत होते. शेवटी मानदुखीचा त्रास अधिकच वाढल्यानंंतर अखेर त्यांना शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागला आहे. आज सकाळी साडेसात वाजता ही शस्त्रक्रिया पार पडली.

सकाळी साडेसात वाजता सुरु झालेली ही शस्त्रक्रिया एक तास चालू होती. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मुख्यमंत्र्याना आठवडाभर विश्रांती घ्यायला सांंगितली आहे. एका आठवड्यानंतर मुख्यमंत्र्याची फिजीओथेरपी सुरू करणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिवाय मुख्यमंत्र्याची तब्येत आता ठिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री बुधावारीच तपासण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. काही महत्त्वाच्या तपासण्यानंतर मानदुखी अधिक बळावू नये यासाठी हा शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यानी यांसदर्भात अगोदरच निवेदनातून कल्पना दिली होती. मानदुखीवर व्यवस्थित उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचंही त्यांनी निवेदनातून सांगितलं होत.