मुंबई बाँम्ब स्फोटातील या आरोपीचा मृत्यू

0
287

नाशिक, दि. २६ (पीसीबी) : मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकच्या कारागृहात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो 2018 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.युसूफ मेमन हा टायगर मेमनचा भाऊ होता.

1992-93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 800 जणांना मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. या भयावह बॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचं अख्ख कुटुंब हे आरोपी होते.

मेमन कुटुंबातील आरोपी टायगर मेमन, युसूफ मेमन, रुबिना मेमन, याकूब मेमन, इसा मेमन हे सर्व आरोपी आहेत. यापैकी टायगर मेमन अजूनही फरार आहे. तर याकूबला फाशी देण्यात आली आहे. इसा, रुबिना, युसूफ हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. यापैकी युसूफचा आज नाशिक जेलमध्ये हृदय विकाराने मृत्यू झाला आहे.

12 मार्च 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट
मुंबई 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. 12 मार्चला 12 ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी होते. या बॉम्बस्फोटासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणलं होतं. त्यातील केवळ 10 टक्केच आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोटात जीवितहानीप्रमाणे 27 कोटींची वित्तहानीही झाली होती.

या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या स्फोटाचा मास्टरमाईंड आहे. तर आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कय्यूम यांचा समावेश होता.