मित्रांसोबत खेळण्यासाठी जातो म्हणून गेलेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता

0
595

कासारवाडी, दि. ६ (पीसीबी) – कासारवाडी येथे एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याला मोबाईल गेम खेळण्याचा नाद आहे. तो मित्रांसोबत खेळण्यासाठी जात असल्याचे घरातून गेला तो चार दिवसांनंतरही परत आला नाही, याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली आहे.

ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी दहा वाजता केशवनगर, कासारवाडी येथे घडली. 14 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला असून त्याच्या वडिलांनी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला मोबाईल फोनवर खेळण्याचा नाद आहे. त्यासाठी तो यापूर्वी देखील अनेकदा घरातून निघून गेला होता. चार-पाच दिवसांनी तो परत घरी आला होता. रविवारी सकाळी दहा वाजता फिर्यादी यांचा मुलगा मित्रांसोबत खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर गेला. तो परत आला. नाही. मागच्या वेळी प्रमाणे यावेळी देखील तो काही दिवसांनी परत घरी येईल, या आशेवर त्याच्या घरचे होते. मात्र तो चार दिवस उलटले तरी घरी आला नाही. त्यामुळे त्याला अज्ञाताने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.