मावशीचा पती आणि फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

0
255

दिघी, दि. १ (पीसीबी) – मावशीच्या घरी राहण्यासाठी आल्यानंतर मावशीच्या पतीने (काका) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी मुलगी तिच्या घरी गेली असता तिथे तिच्या फेसबुक फ्रेंडने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उकडीस आला. 40 वर्षीय काका आणि विशाल कांबळे (रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत १६ वर्षीय मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2020 पासून 29 सप्टेंबर 2020 या कालावधीत दिघी गाव आणि लोहगाव येथे घडला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मावशीकडे दिघी येथे राहायला आली होती. त्यावेळी तिच्या मावशीच्या पतीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाला काहीही सांगू नको, असे काकाने तिला सांगितले.

काही दिवसानंतर मुलगी तिच्या येरवडा येथील घरी राहण्यासाठी गेली. तिथे तिची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी विशाल याच्याशी ओळख झाली. त्याने पीडित मुलीला त्याच्या लोहगाव येथील घरी नेऊन तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती राहिली. डॉक्टरांच्या तपासणीनंतर हा प्रकार उकडीस आला. त्यानंतर याबाबत बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.