मालेगावचे पेशंट धुळे किंवा नाशिकला आणू नका… माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांची मागणी

0
251

धुळे, दि. ९ (पीसीबी) – मालेगाव शहरातील कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहेत. या पेशंटवर उपचार करण्यासाठी त्यांना जवळच नाशिक अथवा धुळे शहरात हलविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, त्याला आमचा विरोध आहे, अशी स्पष्ठ भूमिका भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी घेतली आहे.

श्री. भामरे यांनी त्यासंदर्भात ट्विट केले आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. दोन शहरात आणि समाजातही तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचे पेशंट ४०० पर्यंत पोहचल्याने मालेगाव शहरातील रुग्णालये खचाखच भरलेली आहेत.
भामरे म्हणाले, धुळे शहरात जवळपास ३५ केसेस आहेत. त्यातील बहुतेकांचे मालेगाव कनेक्शन आहे. मी वारंवार ओरडत आलो की, मालेगावला सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्य नाही. पोलिस आणि महापालिका प्रशासनाला तिथले नेते जुमानत नाहीत. त्यामुळे कोरोना तिथे पसरला आहे. प्रशासन पूर्णतः फेल झाले आहे. तिथे लष्कर मागवा, अशी मागणी मी वारंवार करतो आहे. केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत. अजूनही भयानक परिस्थिती होण्याच्या आत लष्कर मागवा. मालेगावचे पेशंट मालेगावलाच उपचार करा, ते धुळे किंवा नाशिकला आणू नका अन्यथा दुसरे मालेगाव होईल. कोणत्याही परिस्थितीत मालेगावचे पेशंट धुळे किंवा नाशिकला आणू नका. मालेगावला सगळी सोय होऊ शकते, असे भामरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.