माफ करा, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार – जितेंद्र आव्हाड

0
792

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसेच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे,” असेही पवारांनी म्हटले आहे. यानंतरही राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण ईडी कार्यालयावर येणार असल्याचे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी यांदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. माफ करा, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचं नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्क रोग, मांडीच्या हाडाचं ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय, वय वर्ष ७९, हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय, उद्या साठी माफ करा. असं ट्विट त्यांनी केले आहे. तसंच आव्हाड यांनी या ट्विटमध्ये शरद पवार यांनादेखील टॅग केले आहे.