माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारू; करणी सेनेची जावेद अख्तर यांना धमकी

0
404

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांना महाराष्ट्र करणी सेनेने धमकी दिली आहे. तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू, अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी दिली आहे. करणी सेनेने यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘आपल्या मर्यादांना ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरं जावं,’ असं त्या व्हिडिओत म्हटलं आहे.