मान्सूनचा मुहूर्त लांबला; राज्यात १० जूनला येणार

0
349

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतात मान्सून विलंबाने दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानच्या समुद्रात दाखल झालेला मान्सून उत्तर दिशेला किंचितसा पुढे सरकला असून, तो १ जून रोजी म्यानमार आणि श्रीलंकेत दाखल होईल; तर केरळमध्ये पोहोचण्यास ६ जून उजाडणार आहे. त्यामुळे मुंबईत सर्वसाधारण १० जूननंतर मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

मान्सून केरळात ६ जूनला दाखल होईल, मात्र या वेळापत्रकात दोन दिवस मागेपुढे होतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळात स्थिरावतो.

काहि राज्यात

पाऊस

गेल्या २४ तासांत सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि ओरिसाच्या उत्तर भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम हिमालयावर हलक्या पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा अंदाज

ओडिशा, दक्षिण कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम हिमालयावर