मानव एकता दिवसा निमित्त संत निरंकारी भक्तांकडून ११२५ युनिट रक्तदान…

0
197

पिंपरी,दि. २५ (पीसीबी)  :निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवार, दि.२४ एप्रिल २०२२ रोजी संत निरंकारी मिशन पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, काळेवाडी पिंपरी येथे ८१५ , तसेच संत निरंकारी सत्संग भवन, पेरणे-फाटा येथे ३१० असे एकूण ११२५ युनिट रक्त संकलित करण्यात आले. . या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी,औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी, (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, या कार्यक्रमाला श्रीरंग आप्पा बारणे (खासदार, मावळ), आण्णा बनसोडे, (आमदार, पिंपरी) विठ्ठल जाधव (प्रमुख, शांतिदूत परिवार) उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक,राजकीय,शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून सदिच्छा भेट दिली.
“मानवतेच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित व्हावे, या भावनेने प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत करावे”, असे उद्गार सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी मानव एकता दिवसाच्या कार्यक्रमादिवशी काढले. युगप्रवर्तक सदगुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी आध्यात्मिक जागृती द्वारा विश्वबंधुत्व तसेच एकत्व चा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचवला. त्याचसोबत सेवेची मूर्ती चाचा प्रताप सिंह जी आणि अन्य भक्तांचे स्मरण करण्यात आले.
संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर आयोजित केलेल्या २७२ रक्तदान शिबिरांमध्ये ५०,००० हुन अधिक युनिट रक्त संकलन झाल्याची माहिती मंडळाद्वारे देण्यात आली आहे.
रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅली चे आयोजन पिंपरी-काळेवाडी परिसरात केले होते.या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार गिरधारीलाल मतनानी (पिंपरी सेक्टर प्रमुख) यांनी मानले. किशनलाल अडवाणी (क्षेत्रीय संचालक, पिंपरी) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलानी आपले योगदान दिले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील संयोजक,मुखी,संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.