माजी मंत्री सदाभाऊ खोत कोरोना पॉझिटिव्ह

0
330

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  देशात तसंच महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक संख्येने रूग्ण मिळत असताना आता लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे.

माझी कोवीड 19 टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून सध्या मी क्वॉरंटाईन झालो आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असं आवाहन करत गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन, असा विश्वास देखील सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.

सतत नागरिकांच्या संपर्कामुळे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार कोरोना पॉझिटिव्ह येत असत. अनेक नेत्यांनी खबरदरी घेतल्याने आता ते प्रमाण आता आटोक्यात आले आहे.