महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचे अपहरण करुन जबर मारहाण; तिघांना अटक

0
399

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिघा जणांनी मिळून चिंचवड येथील तरुणाचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि चिंचवड येथे नेऊन रॉड आणि बांबुने जबर मारहाण करुन हात फ्रॅक्चर केला. ही घटना शनिवारी (दि.९) सकाळी अकरा ते दुपारी चारच्या सुमारास विप्रो सर्कल हिंजवडी फेज २, भोसरी एमआयडीसी ते चिंचवड स्टेशन चौक दरम्यान घडली.