महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठेच काही ताळमेळ नाही – गिरीश महाजन

0
524
जळगाव, दि.८ (पीसीबी) – जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कृतज्ञता सत्कार सोहळा समारंभातील दरम्यान त्यांनी ही टीका केली. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात गिरीश महाजन यांनी ६५ कोटीचा भरघोस निधी वरणगावच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता. त्या अनुषंगाने धरणगावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करून गिरीश महाजन यांचा भव्य कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठेच काही ताळमेळ नाही. तीन पक्षांचे सरकार आहे. कोणाचे कुणाला काहीही माहिती नाही. मला कोणाबाबतही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. पण अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे,” अशी टीका भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
‘सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यात उत्तर महाराष्ट्रात साधं नाव सुद्धा नाही. कुठला निधी नाही. अपूर्ण योजना कशा पूर्ण करायच्या हा प्रश्न सध्या आमच्यासमोर आहे. सरकार फक्त पश्चिम महाराष्ट्र पुरतं मर्यादित आहे की काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.