महाविकासाआघाडीच्या सत्तास्थापनेसाठी आज महत्वाचा दिवस

0
368

मुंबई,दि.२२(पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करणार हे आता निश्चित झालं आहे. या तिन्ही पक्षांची आज दुपारी तीन वाजता संयुक्त बैठक होणार आहे. बैठकीनंतर तिन्ही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये चर्चा झाली. किमात समान कार्यक्रमावर या बैठकीत एकमत झाल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आज १२ वाजता मित्रपक्षांसोबत बैठक होणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील प्रदिर्घ चर्चेनंतर अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना १६, राष्ट्रवादीला १५ तर काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय.