महाराष्ट्रातील ४४ पोलीसांना मिळणार राष्ट्रपती पोलीस पदक; पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांचा समावेश

0
1011

दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रपती पोलीस पदकांची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांचा समावेश आहे. उद्या शनिवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलिसांना त्यांच्या विशेष शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी ३ पोलिसांना पीपीएमजी पुरस्कार तसेच राष्ट्रपती पुरस्काराअतंर्गत १४६ पोलिसांना पोलीस शौर्य पदक (पीएमजी), ७४ पोलिसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमडीएस ) आणि ६३२ पोलिसांना पोलीस पदक (पीएमएमएस) जाहीर करण्यात आली आहेत.

राष्ट्रपती पोलीस पुरस्कार २०१९ चे महाराष्ट्रातील मानकरी –

वरळी येथील अँटी करप्शन ब्युरोचे अॅडिशनल डीजीपी बिपिन कुमार सिंह.

नवी मुंबई येथील असिस्टंट कमांडर भास्कर महाडिक  एस. आर. पी. एफ.

मुंबई येथील खेरवाडी विभागाचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस दिनेश जोशी.

रत्नागिरीचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक विष्णू नगर.

पोलीस पुरस्कार २०१९ चे मानकरी –

शहाजी उमप, मनोज पाटील, सतीश माने, गणपतराव माडगूळकर, शरद नाईक, गणपत तरंगे, मंगेश सावंत, नितीन आलंनूरे, सचिन राणे, अरविंद गोकुळे, संजय पुरांदरे, नंदकुमार गोपाळे, सचिन कदम, गजानन पवार, धनश्री कर्मारकर, अनिल अर्जुन शिंदे, सत्यवान राऊत, नंदकिशोर शेलार, अशोक भोसले, विलास मोहिते, प्रदिप पाटील, राजकुमार वरुडकर, लक्ष्मण थोरात, मोहन घोरपडे, गिरीधर देसाई, पुरुषोत्तम देशपांडे, अमरसिंग चौधरी, मनोहर खांगावकर, जाकीर शेख, दत्तात्रय चौधर, सुनील कुलकर्णी, गणपती आरे, कृष्णा जाधव, पांडुरंग तलवाडेकर, अरुण कदम, दत्तात्रय मोहिते, भानुदास मनवी, दत्तात्रय, विनोद ठाकरे आदींना पोलीस पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.