महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर टँकर-जीपची धडक; १ ठार, ९ जखमी

0
439

महाबळेश्वर, दि. २९ (पीसीबी) – महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यावर एका वळणावर समोरून आलेल्या टँकरवर जीप आदळून झालेल्या अपघातात चालक ठार तर नऊ जण जखमी झाले .जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील असून सहलीसाठी महाबळेश्वरला आले होते. महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या उस्मानाबाद येथील युवकांच्या जीपने (एम एच २५आर ९२६८) समोरून येणाऱ्या टँकरला (एम एच ०४बीसी०५८९) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात चालक जागीच ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले.

जीपच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व वळणाचा अंदाज न आल्याने जीपने समोरून आलेल्या टँकरला जोरदार धडक दिली.

अपघातात चालक अक्षय महादेव काळे जागीच ठार झाले .अरबाज राहिमतुल्ला शेख (वय २१)अनिकेत भातमरेकर (२०) कृष्णा मगर(२२)वसंत ज्ञानेश्वर कदम(२१)दिगंबर गायकवाड (२२)ऋषिकेश विलास नाईक (२०) शेखर वासुदेव धंगेकर (१९)पंकज प्रल्हाद कावळे(१९) विजय प्रचंड भिसे (१९) सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत .अपघात झाल्याचे समजताच महाबळेश्वर व पाचगणीच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे .अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.