महापालिकेला फसवणाऱ्या ठेकेदारावर आयुक्तांची ‘श्रीकृपा’ !

0
297

– माजी महापौर योगेश बहल यांचा आरोप

पिंपरी, दि.११(पीसीबी) – बोगस कागदपत्रे सादर करून पिंपरी – चिंचवड महापालिकेची फसवणूक करणाNया श्रीकृपा सव्र्हीसेस या ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्यास महापालिका आयुक्तांकडून दिरंगाई केली जात आहे, असा आरोप माजी महापौर नगरसेवक योगेश बहल यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात महापालिकेची फसवणूक करणाNया ठेकेदार आणि अधिकाNयांवर कडक कारवाई करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. अन्यथा न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही बहल यांंनी निवेदनाद्वारे दिला आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना बहल यांनी स्मरण पत्र पाठविले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याच्या निविदेमध्ये श्रीकृपा सव्र्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराने खोटी कागदपत्रे सादर केली. अनुभवाचा बोगस दाखला निविदा प्रक्रियेसोबत जोडून महापालिकेची फसवणूक केली. याबाबत खातरजमा करुन बोगसगिरीचे सर्व पुरावे महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतरही महिनाभरापासून या ठेकेदारावर कारवाईस दिरंगाई केली जात आहे. ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे.

प्रशासनातील काही अधिकारी आणि सत्ताधारी भाजपच्या नेतेमंडळींचे आर्थिक हित साधण्यासाठी केलेला हा गंभीर प्रकार झाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या ठेकेदाराची चौकशी करण्याऐवजी महापालिकेची फसवणूक केल्याची बक्षीसी म्हणून आरोग्य विभागातील कोट्यावधी रुपयांचे रस्ते साफसफाईचे काम देण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराला नवीन कोणतेही काम देऊ नये. तसेच वैद्यकीय विभागाने जे मनुष्यबळ पुरवठ्याचे काम दिले आहे. त्याबाबत कोणतेही बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी बहल यांनी केली. महापालिकेची खोट्या कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा प्रकार आहे. त्यामुळे आयुक्तांनी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्तांनी कारवाई केली नाही. यावरुन आयुक्त सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येते, असा आरोप बहल यांनी केला आहे.