महापालिका निवडणूक ऑक्टोंबरमध्ये शक्य ! सर्वसाधारण आरक्षण रद्द होणार

0
280

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – तीन सदस्यांचाच प्रभाग कायम ठेवून ऑक्टोंबर च्या दरम्यान महापालिका सार्वत्रिक निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. पूर्वी काढलेले एसटी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवत सर्वसाधारण जागांतून ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक शाखेने काढलेली आरक्षण सोडत रद्द होणार असून नव्याने आरक्षण सोडत काढली जाईल. दरम्यान, एससी, एसटीची आरक्षण सोडत कायम राहणार आहे.

पिंपरी महापालिकेत 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात  19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14  या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी  44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल.  31 मे 2022 रोजी काढलेली ही एससी, एसटीची आरक्षण सोडत कायम राहील. केवळ सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द होईल.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याने सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. सर्वसाधारणामधून ओबीसींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.  ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणानुसार अंदाजे ओबीसींसाठी 30 ते 35 जागा राहतील. त्यातील निम्या जागा महिला आणि निम्या जागा पुरुषांसाठी राहतील.

”ओबीसी समाजाला किती टक्के राजकीय आरक्षण मिळाले आहे, याची नेमकी आकडेवारी अद्यापर्यंत मिळाली नाही. अंदाजे 30 ते 35 जागा ओबीसी समाजाला मिळतील. त्यातील निम्या जागा महिलांसाटी राहतील. नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येईल. एससी आणि एसटीचे आरक्षण कायम राहील, असे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.