महापालिका निवडणुकीच ठरलं, तयारीला लागा

0
273

पुणे , दि. ५ (पीसीबी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यासोबत संवाद साधला आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असतांना शरद पवार यांनी निवडणुकीच्या बाबतीत महत्वाचे विधान केले आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचनाही दिल्या आहे. यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामाला लागा अशा सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मे महिन्यात राज्यात निवडणुका लागतील असंही सांगून टाकले आहे. याशिवाय संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच शिबीराला सुरूवात करणार असल्याचेही म्हंटले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुण्यातील बैठकीत ही माहिती दिल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत, बहुतांश ठिकाणी प्रशासकच हे सर्व कारभार पाहत आहे. निवडणुका जाहीर कधी होतील या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असतात, पण थेट मे महिन्यात निवडणुका होतील अशी माहिती शरद पवार यांनी पुण्याच्या बैठकीत संगीतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज पुण्यातील पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, गट आणि गण नेते यांच्यात संवाद बैठक पार पडली आहे.
त्यादरम्यान शरद पवार यांनी अडचणी विचारल्या होत्या, त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर अक्षरशः गटबाजीचा पाढाही वाचला होता.
निवडणुकीचा भाकीत वर्तविण्यात शरद पवार यांचे अंदाज अनेकदा खरे झाले आहे, त्यामुळे निवडणूक मे मध्ये होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.