‘मला कामावर घ्या, नाहीतर तुमचा लॅपटॉप पाण्यात टाकून देईन’; कंपनीतून काढून टाकलेल्या कामगाराची धमकी

0
332

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – कंपनीने कामावरून काढून टाकले असताना देखील लॅपटॉप परत दिला नाही. तसेच संबंधित कामगाराने ‘मला कामावर घ्या, नाहीतर मी तुमचा लॅपटॉप पाण्यात टाकून देईन, अशी धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास स्लेंडर मेगापाॅलीस फेस -2, माण-हिंजवडी येथे घडली.

पियुष आगरवाल (वय 42, रा. स्लेंडर मेगापाॅलीस फेस-2, माण-हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नोकरी करीत असलेल्या कंपनीचे काम करण्यासाठी 42 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप दिला होता. कंपनीने कामावरून काढून टाकले असताना देखील आरोपीने लॅपटॉप परत दिला नाही. लॅपटॉप मध्ये कंपनीचा डाटा, प्रोजेक्ट डाटाएस ई झेड आय कार्ड, ऑफिसच्या चाव्या, ऑफिशियल ई-मेल इत्यादी परत दिले नाही. ‘मला कामावर घ्या, नाहीतर मी तुमचा लॅपटॉप पाण्यात टाकून देईन, तुम्ही डाटा कसे वापरता ते मी बघतोच’, अशी धमकी आरोपीने दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.