मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने गोपीनाथराव मुंडेंना श्रद्धांजली

0
798

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – लोकनेते, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या ५ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी- चिंचवड मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या  वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) चे खजिनदार दत्तात्रय धोंडगे यांच्या हस्ते  गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार  म्हणाले की, स्वाभिमान व संघर्ष हे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिठ्य होते, मुंडे साहेबांच्या जाण्याने आपला महाराष्ट्र पोरका झाला, गोपीनाथराव मुंडे हे सर्व जनतेचे आधारस्तंभ होते आणि खऱ्या अर्थाने ते एक जानता नेता होते म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती.

यावेळी भिष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे, जय भगवान संघाचे अध्यक्ष धराडे ,  ह्युमन राईटस चे सदस्य सुनील काकडे,  प्रबोधनकार शारदाताई  मुंडे,  संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य महादेव पाटेकर, बिरू व्हनमाने, महादेव बनसोडे, भरत शिंगोटे,  युवराज नलावडे,  युवराज नलावडे,  विजय वडमारे, मिनाक्षी खैरनार, सुनंदा भोज, मारुती बानेवर, शंकर तांबे,  बळीराम माळी, संदिप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर यांनी आभार मानले.