ममता बॅनर्जी तब्बल 58 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी

0
266

कोलकाता, दि. ३ (पीसीबी) – पश्चिम बंगाल मध्ये मागील काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसने मोठा विजय प्राप्त करत भाजपला चारीमुंड्या चीत करत सत्ता काबीज केली आहे. पण निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर भवानीपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत ममतांनी विजय मिळवला आहे.

भवानीपूर मतदार संघातील पोटनिवडणुकीत ममतांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांचा दारूण पराभव केला आहे. ममतांनी टिबरेवाल यांच्यावर तब्बल 58 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. ममतांच्या विजय प्राप्तीनंतर एकच जल्लोष साजरा केला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यलयासह ममतांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जमा केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सकाळपासूनच मतमोजणीच्या फेरीमध्ये आघाडीवर होत्या. आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली होती. या पोटनिवडणुकीत 57 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दरम्यान, ममतांनी या आधी आपला बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमधून दोन विजय मिळवला होता. त्यामुळं आता ममतांना आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळण्यासाठी ममतांना त्यांच्या बालेकिल्ल्याचाच आधार घ्यावा लागला आहे.