“ममता बॅनर्जींना मत दिल्यास ‘येथे’ मिनी पाकिस्तान होईल”

0
208

कोलकाता, दि. ३० (पीसीबी) – ‘ममता बॅनर्जींना मत देऊ नका. जर तुम्ही त्यांना मतदान केले तर येथे मिनी पाकिस्तान होईल,’ अशा आशयाचं असं वक्तव्य सुवेंदू अधिकारी यांनी केलं. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने ही बातमी दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अल्पसंख्याकांना संतुष्ट करणात गुंतल्या आहेत असा आरोप भाजपाचे नेते सुवेन्दु अधिकारी यांनी सोमवारी केला. पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखण्यासाठी टीएमसीला मत न देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
नंदीग्राम येथील एका स्थानिक मंदिराला भेट दिल्यानंतर अधिकारी यांनी हे वक्तव्य केलं. टीएमसी सुप्रीमोवर टीका करताना ते म्हणाले की, ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याची त्यांना सवय लागली आहे आणि म्हणूनच त्यांनी लोकांना “होली मुबारक” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसर्‍या टप्प्यातील मतदान नंदीग्राममध्ये 1 एप्रिल रोजी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात 294 जागांसाठी मतदान होणार आहे.