मनोरंजनाकरिता राज ठाकरेंचे भाषण बघावे आणि टाळ्या वाजवाव्यात – विक्रम गोखले

0
704

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाखवलेले व्हिडिओ किती खरे आणि किती खोटे असा सवाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. ज्यांना मनोरंजनाकरिता राज ठाकरे यांचे भाषण आवडतात त्यांनी ते बघावे आणि टाळ्या वाजवाव्यात, असा टोलाही  गोखले यांनी लगावला. 

गोखले  एका वृत्तवाहिनीच्या  कार्यक्रमात  बोलत होते.  यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मोदी सरकारची कामगिरी अशा विविध मुद्द्यांवर परखड भाष्य केले.

सैन्यातील जवानांपेक्षा व्यापारी जास्त धाडसी असतो, असे विधान करतानाचा मोदींचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी प्रचारसभांमध्ये वारंवार दाखवला होता. यावर विचारले असता विक्रम गोखले यांनी ज्यांना मनोरंजनाकरिता राज ठाकरेंचे भाषण आवडतात त्यांनी ते बघावे आणि टाळ्या वाजवाव्यात, असे सांगितले.

मोदींनी केलेल्या नोटाबंदीमुळे काहीही साध्य झालेले नाही. बुलेट ट्रेनला देशातील सरकारने प्राधान्य देऊ नये, देशाने शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंह यांचे समर्थन करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा मी निषेध करतो, असेही गोखले यांनी यावेळी म्हटले.