मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
219

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मध्यरात्रीच्या वेळी घरात घुसून एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 15) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास फुलेनगर, पिंपरी येथे घडली.

दिनेश बाळासाहेब शिंदे (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, मोहननगर, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरात झोपलेली असताना आरोपी नग्नावस्थेत महिलेच्या घरात मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घुसला. त्याने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.