‘मत व्यक्त करा, मतदान करा’; रेणुका शहाणेंचे जनतेला आवाहन

0
488

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. राज्यातील २८८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांचा उत्साह दिसत आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सकाळीच आपला हक्क बजावला. यामध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील मतदान केले. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

“आताच मत देऊन आले. मतदान हा आपला हक्क नाही तर ती जबाबदारी आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि मत व्यक्त करा, मतदान करा”, असे म्हणत रेणुका शहाणे यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.