“मंत्रिपद मिळालेल्या नेत्यांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे”

0
645

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : नुकताच मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि या दरम्यान त्यांनी काही मोठे निर्णय घेतले. त्यांनी या घेतलेल्या निर्णयांवर ‘भाजपचा जनाधार वाढणार की घटणार?’ या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी उत्तर दिल आहे. ‘मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे’, असं त्या म्हणाल्या.

पुढे त्या असंही म्हणाल्या कि, ”आम्ही कष्ट केले ते पक्षासाठी केले. माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा असं मानत नाही. आणखी कोणी म्हणत असेल तर मला त्याबाबत काही म्हणायचं नाही, असं सांगतानाच पक्षात जे नवीन अॅडिशन झालं. त्याचं स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांचंही स्वागत आहे. त्या मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझी बहिण राजकारणात आली. त्यावेळी त्या विक्रमी मताने विजयी झाल्या. ते स्वाभाविक होतं. मात्र, गेल्या निवडणुकीत त्या मेरिटवर निवडून आल्या. प्रचंड मतं त्यांना मिळाली. पण एखादा कार्यकर्ता मोठा होत असेल तर नेत्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असते. एखाद्याची नेत्याप्रमाणे उंची वाढत असेल तर तो त्या नेत्याचा विजय आहे. त्यामुळे कुणाला काय मिळालं त्यावरून दु:ख वाटण्याचं कारण नाही, असं सांगतानाच काही नवी लोक जरूर आले आहेत. पण ते आलेत त्यावर पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतला असेल. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल, पक्षात बदल होईल’ असं वाटतं, असं त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या कि, ‘ज्या लोकांना पद मिळाली आहेत, ते मुंडे साहेबांमुळेच पुढे गेले आहेत. ते मुंडेंच्या विचाराचे लोक आहेत. ते मुंडे परिवारापेक्षा मोठे व्हावेत हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे ते आणि पक्ष वेगळा वाटत नाही. त्याचं दु:ख नाही. आम्हाला आनंदच आहे. विधानपरिषदेतही नव्या लोकांना घेतलं. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असेल. पक्षाने तसा अभ्यास केला असेल. नव्या लोकांना नवीन रोल मिळत असेल तर पक्ष त्याच्या फायद्या नुकसानाचं मोजमाप करेल.’