भोसरी येथे दुकानात घुसून शस्त्राचा धाक दाखवून लुटले

0
320

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – दुकानात येऊन तीन अनोळखी चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून दुकानदाराला लुटले. दुकानातून रोख रक्कम, लॅपटॉप आणि मोबईल फोन असा दोन लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री सातच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली.

अरुण प्रल्हाद गाडेकर (वय 41, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडेकर यांचे एमआयडीसी भोसरीमध्ये टी ब्लॉक रचना कॉम्प्लेक्समध्ये गुरुदत्त एन्टरप्रायजेस हे दुकान आहे. रविवारी सायंकाळी गाडेकर त्यांच्या दुकानात होते. त्यावेळी तीन आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी गाडेकर यांना सत्तूर दाखवून तसेच हाताने मारहाण व शिवीगाळ केली.
शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी दुकानातील दोन लाख रुपये रोख रक्कम, एक लॅपटॉप आणि मोबईल फोन असा दोन लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.