भोसरी एमआयडीसीतील कृष्णा प्रिंटिंग प्रेसला आग

0
542

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी महात्मा फुलेनगर येथील पवना कॉम्प्लेक्स मधील कृष्णा प्रिंटिंग प्रेसला आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर संत तुकारामनगर आणि प्राधिकरण अग्निशामक दलाचे एकूण ५ बंब घटनेस्थळी दाखल झाले. आणि एका तासाच्या आत आग आटोक्यात आणली. मात्र आगीत कृष्णा प्रिंटिंग प्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीच्या झळा शेजारील शॉपला देखील लागल्याने संपूर्ण विद्युत यंत्रणा व एक दुचाकी देखील जाळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीतहाणी झाली नाही.