भोसरीत पत्नीच्या संमतीशिवाय दुसरा विवाह करणाऱ्या पती विरोधात गुन्हा

0
602

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – घरगुती कारणांवरून पत्नीशी भांडण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच तिच्या संमतीशिवाय पतीने दुसरा विवाह केला. याबाबत पत्नीने पती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.

संदीप रामदास मंगरूळकर (वय ३५, रा. वायगाव, निपाणी, वर्धा) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्यासोबत सासरे रामदास मंगरूळकर (वय ६०), सासू कमल मंगरूळकर, ननंद कविता सावरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पत्नी आणि संदीप यांचे घरगुती कारणांवरून भांडण झाले. त्यावर सासरच्या मंडळींनी संदीप यांच्या पत्नीस शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच संदीप याने त्याच्या पहिल्या पत्नीची संमती नसताना दुसरे लग्न केले. याबाबत संदीपच्या पहिल्या पत्नीने गुन्हा नोंदवला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.