भारताचे डिस्कोकिंग कालवश…

0
207

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बाप्पी लाहिरी (वय 70) यांचे आज सकाळी निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बाप्पी यांचे मूळ नाव होते. बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जुहू येथील क्रिटी बाप्पी लाहिरी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला.