भाजप म्हणजे ‘काळे इंग्रज’; त्यांना सत्तेतून घालवण्यासाठी मतदान करा – नवज्योत सिंग सिद्धू

0
452

इंदूर, दि. ११ (पीसीबी) – काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांनी गोऱ्यांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. इंदूरवासियांनो तुम्ही काळया इंग्रजांपासून देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी भाजपविरोधात मतदान करा, असे आवाहन काँग्रेस नेते   नवज्योत सिंग सिद्धू यांनी  केले आहे.

भाजप म्हणजे ‘काळे इंग्रज’ असे  सांगून  त्यांना सत्तेबाहेर घालवण्यासाठी देश वाचवण्यासाठी मतदान करा,  असे आवाहन नवज्योत सिंग सिद्धू यांनी  इंदूरच्या जनतेला केले. सिध्दू  इंदूरमधील प्रचारसभेत बोलत होते.

दरम्यान,  पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नवज्योत सिंग सिद्धू यांना नोटीस बजावली आहे.  सिद्धू यांचे विधान आदर्श अचारसंहितेचे भंग करणारे आहे. त्यांनी २४ तासांत उत्तर द्यावे, असे आयोगाने नोटीशीत म्हटले आहे.