भाजप फावडे आणि कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेणार नाही – राज ठाकरे  

0
765

नाशिक, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन भाजप फावडे आणि कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेणार नाही, असे सांगून  लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे केला.  

राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी  बोलत होते.

यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्दयावर मनमोकळेपणाने मते मांडली. मुलगा अमितचे लग्न अत्यंत साधेपणाने होणार आहे, असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिले, तर तो आकडा ६ लाखांच्या घरात जातो. त्यामुळे उगाच वधू-वराची ससेहोलपट नको. म्हणून मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याचे राज म्हणाले.

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत. भाजप फावडं आणि कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेणार नाहीत. त्यामुळे आधी लोकसभेला फावडे मारुन घेतील. नंतर विधानसभेला कुऱ्हाड मारून घेतील,  अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.