भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कुटुंबासह कोरोना बाधा

0
298

मुंबई, दि. 10 (पीसीबी): भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबत त्यांच्या घरातील 6 जणांनाही कोरोनाचा संसर्ग  झाल्याची माहिती आहे.
आमदार ठाकूर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यातील रहिवाशी आहेत.
आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी समाजमाध्यमातून याची माहिती दिली आहे. त्यात आमदार म्हणतात, 4 ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अँटीजेन टेस्ट केली. यामध्ये परिवारातील 6 सदस्य कोरोना बाधित आले.
शनिवारी परत सदस्य व संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर केले.  या चाचणीतही माझ्यासह परिवारातील 3 तर संपर्कातील 3 बाधित झाले. तर, 3 अहवाल प्रतिक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची प्रकृती चांगली आहे. मी काळजी घेतो आहे. आपणही घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
3 ऑगस्टपासून मी बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे कॉल येतात. ते घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास एसएमएसद्वारे कामाकरिता उपलब्ध असेन.
माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. लवकर बरे होऊत. लवकरच जनसेवेत असेन, असेही त्यांनी म्हटले आहे.