भाजप आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान

0
462

अमरावती, दि. २६ (पीसीबी) – काँग्रेसकडून आजपासून महापर्दाफाश यात्रा अमरावतीमधून सूरु करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशीच भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे. काही काळ या दोघांमध्ये बंददाराआड चर्चा देखील झाली.

यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसून आमची सुनील देशमुख यांच्याशी मैत्री आहे, म्हणून ते भेटायला आले असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले.

दरम्यान, सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या काळात पालकमंत्री व आमदार पद उपभोगले आहे. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली. त्यामुळे सुनील देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सुनिल देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करत गेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता.