भाजप आणि शिवसेनेला डच्चू देत शांतीगिरी महाराजांचा हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा, खैरेंच्या अडचणीत वाढ

0
350

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय. वेरूळच्या मठात भक्त परिवाराने याबाबतची घोषणा करून माहितीला दुजोरा दिला. तत्वाच्या आधारावर हर्षवर्धन यांना पाठिंबा देत असल्याचे भक्तांनी सांगितले. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यासह जिल्ह्यातही शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.