भाजपा नेत्यांनाच कसा दिलासा मिळतो हा आता संशोधनाचा विषय

0
279

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ३७० कलम याविषयी १४ ट्विट करत टिका केली आहे. या पार्श्वभूमिवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीची ३७० कलम याविषयी भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले.

वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांचा संबंधी दाऊदशी जोडला जातो, ही काही नवीन बाब नाही. या आधी देखील असे प्रयत्न झाले आहेत. नवाब मलिकांची केस खूप जुनी केस आहे. दाऊदशी संबंध नसताना ओढून ताणून संबंध जोडायचा, शरद पवार यांचा संबंध नसताना देखील त्यांचा जोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता, त्यामुळे मला त्यात काही तथ्य दिसत नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याबाबत गृहमंत्री म्हणाले की, मुस्लिम आरक्षणाचं सोडा, शैक्षणीक आरक्षणाबाबत कोर्टाचा निर्णय असताना मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण नाकरलं. भारत हा वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र असलेला देश आहे, आजही भारत अखंड आहे आणि अखंडच राहील त्याचं विघटन करण्याचा प्रयत्न करु नये. असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.

भाजप नेत्यांनात न्यायालयात दिलासा कसा मिळतोय असे विचारले असता, तो एक आश्चर्याचाच प्रश्न असल्याचे गृहमंत्री म्हणाले. “एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळायला लागला बाकीच्या पक्षांच्या लोकांचा विचार..अशा केसेस समोर आहेत, त्याचा सहजपणे कोणाच्या मनात असा प्रश्न येईल, त्याच्यात काही चूकीचं नाही’ असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

जेम्स लेन प्रकरणाबाबत शरद पवारांनी माफी मागावी या मनसेच्या मागणी बाबत गृहमंत्री म्हणाले की, मनसेला अशी अनेकदा माफी मागावी लागेल, शरद पवारांनी माफी मागण्याचा प्रश्न नाही असेही त्यांनी सांगितली.
तसेच हनुमान जयंतीच्या निमीत्ताने भाजपचे मोहीत कंभोज भोंगे वाटणार आहेत, या बाबतीत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना वळसे पाटील यांनी सांगीतले की, भोग्यांच्या बाबतीत ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो तो न्यायालयीन निर्णय असा आहे की, रात्री १० ते सकाळी ६ कोणीही लाऊडस्पिकर मोठ्याने लावू नयेत त्याचे डेसिबल ठरवून दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाने मंदिरावरचे किंवा मस्जिदीवरचे किंवा अन्य ठिकाणचे जे परवानगी घेऊन लावलेल्या भोंग्याविषयी न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाही असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.