भाजपाच्या नुपूर शर्मा यांचे नेदरलँड खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी केले उघडपणे समर्थन

0
260

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल भाजपाने रविवारी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आणि दिल्लीच्या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. इराण, कतार आणि कुवेत या तीन प्रमुख आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून विरोध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा विरोध होत असताना नेदरलँडचे खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी उघडपणे त्यांचे समर्थन केले आहे.

भारतीय नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबद्दल सत्य सांगितल्याने अरब आणि इस्लामिक देश संतापले हे अतिशय हास्यास्पद आहे, असे गर्ट वाइल्डर्स यांनी म्हटले आहे. “तुष्टीकरणाचे राजकारण कधीही कामाला येत नाही. यामुळे गोष्टी आणखी खराब होतात. म्हणूनच भारतातील माझ्या प्रिय मित्रांनो, इस्लामिक देशांना घाबरू नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि प्रेषितांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्मांचा अभिमान बाळगा, असे गीर्ट यांनी म्हटले आहे.