भाजपला शिव्या देणाऱ्या लोकांचा पक्षप्रवेश सुरू आहे – संजय राऊत

0
501

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – उगवत्या सूर्याला नमस्कार करणे, ही जगाची रित आहे,  असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. एकेकाळी संघाला आणि भाजपला शिव्या देणाऱ्या लोकांचा सध्या पक्षप्रवेश होतो आहे. इतरांकडे निष्ठा राहिलेली नाही, मात्र शिवसेनेकडे निष्ठा कायम आहे. आमच्या पक्षात सचिन अहिर आले. मात्र, ते कोणत्याही कमिटमेंटशिवाय आले आहेत, असेही राऊत  यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. यावेळी त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या  वक्तव्याचाही संदर्भ दिला. भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश हे स्वार्थापोटी होत आहेत,  असे चंद्रकांत पाटील म्हटले होते.

यावर ते म्हणाले की, कोण माणूस कुठे गेल्यावर शुद्ध होतो यावर माझा विश्वास नाही. विचारधारा मान्य असते म्हणून कोणी इतर पक्षांमध्ये जात नाही ती फक्त वेळेची तडजोड असते. विचारधारा वगैरे शब्द कोणीही वापरू नये, आता विचारधारा वगैरे काही राहिलेले नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.