भाजपच्या ‘शंखनादा’नंतर आता मनसेचा ‘घंटानाद’; मंदिरे खुली करण्यासाठी आता मनसे आक्रमक

0
363

पुणे, दि.०२ (पीसीबी) : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याप्रमाणे आता पुण्यात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केलं.

‘जनआशीर्वाद यात्रा, मेळावे, परस्परांविरोधात आंदोलने होत आहेत. परंतु सण आला की करोनाचे कारण देत निर्बंध कठोर केले जातात. ‘लॉकडाऊन आवडे सर्वाना’ अशी राज्य सरकारची परिस्थिती आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारला लक्ष्य केले. ‘नियम सर्वाना सारखे असले पाहिजे. एकाला एक नियम तर दुसऱ्याला दुसरा, हे बरोबर नाही. शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता.

राज ठाकरे राज्यतील सण-उत्सवांवरील बंदी आणि मंदिरं उघडण्यावरील निर्बंधांवर बोलताना म्हणाले होते की, नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते.”

करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती