‘भाजपचे नेते कोरोनाच राजकारण करतायत’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

0
253

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : “कोरोना रुग्ण वाढत असतानाही लोक बेफिकीरपणे गार्डन आणि बाजारपेठांमध्ये फिरत आहेत. लग्नाला जात आहेत. अशा बेफिकीर वागण्याने एकवेळ अशी येईल की, रुग्णालयात बेड कमी पडू लागतील. लोकांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केले. राज्यात लॉकडाऊन लागण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. मात्र, राज्यात दिवसाला कोरोनाचे 50 हजार रुग्ण सापडल्यानंतरही लोकांना परिस्थितीचे सोयरंसुतक नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

पुढे भाजपवरती जहरी टीका करत ते म्हणाले कि, ‘भाजपचे नेते त्यांचं राजकारण करत आहेत. लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे त्यांना कळायलं हवं. मोदी थाळी वाजवा, मेणबत्ती लावा असं म्हणतात. भाजपवाल्यांना लोकांच्या जीवाशी देणघेणं नाही. लॉकडाऊन होईल हे आज सांगता येत नाही, पण जर संख्या वाढली, रुग्णालयात बेडस मिळाले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. लोक ही गोष्ट मानायला तयार नाहीत. भाजपच्या नेत्यांकडून उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालेच उदाहरण दिले जात आहे. मात्र, ती राज्ये बेजबाबदार आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये टेस्टिंगच होत नाही,’ असे नवाब मलिक यांनी म्हटले.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.