भाजपची स्वबळावर सत्ता; शिवसेनेला  ५० ते ५५  जागा – नारायण राणे

0
464

कणकवली,  दि. २२ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला  ५० ते ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. तसेच भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे  भाकित भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. राणे यांनी आज ( मंगळवारी)  प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले की,  मी मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) निष्कर्षाशी सहमत नाही. भाजपला या निवडणुकीत १६४ पैकी १३५ जागांवर विजय मिळेल. त्यामुळे भाजप सहजपणे स्वबळावर सत्ता स्थापन करेल. याउलट शिवसेनेची मजल ५० ते ५५ च्या वर जाणार नाही.

कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे  ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील. कणकवलीतील शिवसेनेचा  उमेदवार कोणाच्या ओळखीचा  तरी आहे का?  असा  टोला त्यांनी यावेळी  लगावला.