भर रस्त्यात कारने घेतला पेट अगीत कारचालकाचा होरपळून मृत्यू

0
671
अहमदाबाद, दि,१७ (पीसीबी) – भर रस्त्यात कारमधून अचानक धूर आला आणि कारने पेट घेतला. ही दुर्घटना अहमदाबाद इथे घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच सर्व कार जळून खाक झाली. या दुर्घटनेमध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा कारचालक आगीमुळे गाडीतच अडकला होता. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून अचानक धूर आला आणि आग लागली. या आगीने काही क्षणांत रौद्र रुप धारण केले. गाडी लॉक असल्यानं कार चालकाला गाडीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही. कार चालकानं गाडीतून बाहेर पडण्यासाठी धडपड केली मात्र ही धडपड अपयशी ठरली आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी कार चालक कोण आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अंगावर काटा आणणारा आगीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.