भरधाव दुचाकी ट्रॅक्टरवर आदळली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
322

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणा-या दुचाकीने समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 24) दुपारी दोन वाजता पुणे-आळंदी रोडवर दिघी येथे घडला.

किशोर कुंडलीक थूल (वय 45, रा. संत गजानन महाराज नगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मयत किशोर थूल त्यांच्या होंडा शाईन दुचाकीवरून (एम एच 14 / जी बी 4452) पुणे आळंदी रोडने मॅगझीन चौकाकडे जात होते. ते तालेरा गोडाऊन समोर आले असता त्यांच्या दुचाकीने समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये किशोर गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.