भरदिवसा घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास

0
194

पिंपरी, दि. 12 (पीसीबी): घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम, घड्याळ आणि मोबईल फोन असा एकूण एक लाख 48 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी दोन ते सव्वाचार या कालावधीत साईपार्क, दिघी येथे घडली.

दिपाली काशिनाथ दिपके (वय 26, रा. साईपार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपके यांच्या घरातील लोक शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घराला कुलूप लाऊन बाहेर गेले होते. सव्वाचार वाजता सर्वजण घरी आले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख रुपयांचे पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 35 हजारांची रोख रक्कम, दोन हजारांचे घड्याळ आणि 11 हजारांचा एक मोबईल फोन असा एकूण एक लाख 48 हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.