‘भगवान महावीरस्वामी’जयंतीच्या निमित्ताने आनंद युवा मंच व गौतमलब्धि फ़ाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
336

भोसरी, दि.२६ (पोसीबी) – आज भगवान महावीरस्वामी जयंतीच्या निमित्ताने आनंद युवा मंच व गौतमलब्धि फ़ाउंडेशन ने रक्तदान शिबिराचे आयोजन श्री जैन स्थानक भवन, भोसरी येथे केले होते. मैत्री, बंधुता, प्रेम, अहिंसा, करुणा व जीवदया ची शिकवण महावीर स्वामींनी दिली.आज कोरोना संकटाचे सावट व भिती प्रत्येकाच्या मनामधे आहे. हॉस्पिटल मधे बेडस्,ऑक्सीजन, रक्ताची प्रचंड कमतरता भासत आहे.

अशावेळी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भगवान महावीर जयंती चे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला व त्यास लसीकरण व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही फार उत्तम प्रतिसाद मिळाला. ६१ युनिटस् चे रक्त संकलन झाले. पिंपरी येथील पिंपरी सेरॉलॉजिकल इंस्टीट्यूट ब्लड सेंटर च्या सहयोगाने सर्व प्रशासनिक नियमांचे पालन करुन हे शिबीर उत्तम पणे पार पडले.

यावेळी श्री संघ भोसरीचे अध्यक्ष श्री सुभाषजी चुत्तर आणि पदाधिकारी, गौतमलब्धि फ़ाउंडेशन चे गौतमजी नाबरिया, हर्षदजी गेलडा,भोसरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री जितेंद्रजी कदम, युवा नेता श्री प्रज्योतजी फुगे, जेष्ठ समाजसेविका सौ.शैलजा चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली!

सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन आनंद युवा मंच व गौतमलब्धि फ़ाउंडेशन भोजापुर (भोसरी) अनेक उपक्रम राबविते.कोरोना काळात गरिबांना फुडस पेकेट, शासकीय कर्मचारी, पोलीस बांधव, स्वच्छता कर्मचारी यांना फुडस पेकेट, पाणी, अल्पोपहार ची व्यवस्था केली होती. आणि आजही रक्तदान शिबीर चालु असताना ५५ फुडस पेकेट चे वितरण करण्यात आले.

यावेळी आनंद युवा मंच व गौतमलब्धि फ़ाउंडेशन भोसरी चे संतोष नवलाखा,आनंद डुंगरवाल,योगेश चोरडिया,मंगेश गदिया,रोहन चुत्तर, सुजित चोपडा,आशिष चुत्तर,दिलीप शेटिया, हर्षल बांठिया, निलेश शाळ, श्रीकांत डुंगरवाल, व सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.