बेवड्यांची गर्दी पाहून मलायका संतापली

0
305

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.दरम्यान, भारतात लॉकडाऊन असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळली आहे. सगळे उद्योगधंदे बंद असल्याने सरकारला मिळत असलेले टॅक्स देखील बंद झालेले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे.

दारुची दुकानं सुरू झाल्यानंतर तळीरामांनी वाईन शॉपजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली. एवढेच नव्हे तर कित्येक किलोमीटरच्या रांगा देखील लावल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ने संताप व्यक्त केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.